Tuesday, 14 February 2012

जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र

प्रस्तावना -
महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, भौगोलिक, सांप्रदायिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान आहे. तसेच वैविध्यपूर्ण शेतीसाठी ( ) जुन्नर तालुका संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य तालुका म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र ओझर व श्री क्षेत्र लेण्याद्गी, हौशी पर्यटकांचे आकर्षण असलेला माळशेज घाट, तालुक्यात असलेले विविध किल्ले व गड तसेच वैविध्यपूर्ण शेती या व अशा वैशिष्टयांमुळे जुन्नर तालुका आता कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन, गिर्यारोहण व भाविकांसाठी पर्यटनाचा केंद्गबिंदू म्हणून वेगाने विकसित होत आहे. भविष्यामध्ये पर्यटन तालुका म्हणुन विकसित करणेसाठी जुन्नर तालुक्यातील खालील महत्त्वपूर्ण स्थळांचा विकास करणे आवश्यक आहे.
१) गड व किल्ले :-
अ) शिवनेरी किल्ला -
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान व पायथ्याशी ऐतिहासिक असे जुन्नर शहर. संपूर्ण देशातून असंख्य शिवप्रेमी व पर्यटक दर्शनासाठी वर्षभर या किल्याला भेट देतात.
ब) जीवधन गड -
जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्गी पर्वतरांगामध्ये वसलेला घाटघर ग्रामपंचायत हद्दीतील गड. हा गड महाराष्ट्रातील गिर्यारोहकांसाठी आकर्षणाचे केंद्ग आहे.
क) हडसर किल्ला व चावंडचा किल्ला -
मोठया संख्येने गिर्यारोहक या दोन्ही गडांवर गिर्यारोहणासाठी येत असतात.
ड) हरिश्चंद्गगड -
पुणे व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला अत्यंत महत्त्वपूर्ण गड. जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावातुन जाणार्या रस्त्याने गिर्यारोहक व भाविक या गडावर वर्षभर जात असतात .
इ) नारायणगड -
जुन्नर तालुक्यातील पूर्वेकडील खोडद ग्रामपंचायत हद्दीतील या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे काही काळ वास्तव्य होते असे सांगितले जाते.
2) तीर्थक्षेत्रे व देवस्थाने :-
अ) श्री क्षेत्र लेण्याद्गी -
अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री गिरिजात्मकाचे पांडव कालीन लेण्यामंध्ये वसलेले गणपती मंदीर.
adhsd ब) श्री क्षेत्र ओझर -
अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री विघ्नेश्वराचे हेमाडपंथी गणपती मंदीर.
क) श्री क्षेत्र ब्रम्हनाथ पारुंडे -
संपूर्ण देशामधील कुंभमेळा भरणार्या चार तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो व खुप मोठया संख्येंने साधुगण व भाविक या ठिकाणी येत असतात.
ड) श्री क्षेत्र रेडा समाधी, आळे -
संपूर्ण विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेडयाच्या मुखातून वेद वदविले, त्या रेडयाची समाधी या ठिकाणी आहे.
इ) चैत्यन्य महाराज समाधी, ओतुर-
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री चैत्यन्य महाराजांची समाधी या ठिकाणी आहे.
ई) श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान वडज व धामणखेल -
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री कुलस्वामी खंडोबाची प्रसिध्द मंदिरे.
उ) श्री कपर्दिकेश्वर देवस्थान, ओतुर व श्री कुकडेश्वर देवस्थान पुर -
सर्व भाविकांचे श्रध्दास्थान असलेली श्री शंकराची प्रसिध्द मंदिरे.
ऊ) वरसुबाई देवस्थान, हिवरे पठार -
सर्व भाविकांचे व विशेष करुन महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेले व अत्यंत उंचावर वसलेले देवीचे मंदिर.
फ)श्री रंगनाथ स्वामी महाराज मंदिर आणे -
आणे या ठिकाणी श्री रंगनाथ स्वामी यांचे मंदिर असुन याठिकाणी मोठी यात्रा भरत असुन मोठया प्रमाणात भाविक वर्षभर दर्शनाला येत असतात.
३) कै. यशवंतराव चव्हाण यांचे नियोजित स्मारक, येडगाव :-
तालुक्यातील येडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येडगाव धरणालगत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येणार असुन सदर स्मारकाचा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
४) G.M.R.T. (Giant Meterwave Radio Telescope),खोडद :-
जुन्नर तालुक्यातील खोडद ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेली जगातील सर्वात मोठी दुर्बीण. भारत सरकारचा अणुउर्जा विभाग व टाटा मुलभूत संशोधन संस्था (T.I.F.R.) यांच्या मार्फत खगोल भौतिकीशास्त्राच्या अभ्यासासाठी ही दुर्बीण उभारण्यात आली असुन ३० अँन्टेंनांच्या माध्यमातून कार्यरत आहे.
५) बिबट निवारा केंद्ग, माणिकडोह :-
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे केंद्ग असुन या ठिकाणी सध्या २५ बिबटे ठेवण्यात आले असुन वनविभागामार्फत त्यांची देखभाल केली जाते.
६. धरणे व जलाशय :-
जुन्नर तालुक्यामध्ये कुकडी, मिना, पुष्पावती व मांडवी या मुख्य नद्या असुन या नद्यांवर माणिकडोह व येडगाव (कुकडी नदी), पिंपळगाव जोगा (पुष्पावती नदी), वडज (मिना नदी) व चिल्हेवाडी (मांडवी नदी) ही पाच धरणे आहेत. या धरणांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात शेती जलसिंचनाखाली आली आहे.
७. तमाशा पंढरी, नारायणगावः-
तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायत महाराष्ट्रातील तमाशा पंढरी म्हणून पूर्ण राज्यामध्ये प्रसिध्द आहे. नारायणगाव येथील तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई भाऊ मांग (नाराणगावकर) यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या ठिकाणी दर वर्षी तमाशा महोत्सव भरविण्यात येतो.
८. कृषी पर्यटन व निसर्ग पर्यटन
वैविध्यपुर्ण शेतीसाठी प्रसिध्द असलेला जुन्नर ताुलका आगामी काळात कृषी पर्यटन व निसर्ग पर्यटनासाठी शहरातील पर्यटकांचा केंद्ग बिंदू ठरणार आहे. शेतीमध्ये घेण्यात येणारी विविध पिके, पिकपध्दती, पशुपालन, दैनदिंन शेतीतील कामे तसेच ग्रामिण संस्कृतीचे दर्शन विविध पर्यटकांना अनुभवता येणार आहे. तालुक्यातील गोळेगाव व माणिकडोह याठिकाणी सद्दस्थितीत शेतकर्यांनी कृषी पर्यटन केंद्गे सुरु केलेली आहेत.
विविध औषधी व सुगंधी वनस्पतींचे अस्तित्त्व असलेल्या तालुक्याचे पश्चिमेकडील डोंगर रांगामध्ये असलेले दुर्गावाडी, नाणेघाट, दार्याघाट आणि पूर्वेकडील आणेघाट ही हौशी व अभ्यासू पर्यटकांसाठी महत्त्वाची निसर्ग पर्यटन केंद्गे आहेत.
९.वारकरी सांप्रदाय :-
जुन्नर तालुक्यामध्ये मोठया प्रमाणामध्ये किर्तनकार असून त्यांचे मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातुन प्रबोधनाचे काम केले जाते. तसेच तालुक्याला फार मोठी वारकरी सांप्रदायाची पार्श्वभूमी आहे.

No comments:

Post a Comment