- कृपया वस्तू ऊधार मागू नये. अपमान होईल.
- दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी. विजेचे बिल आम्ही भरतो.
- तीनदा बेल वाजवूनही दरवाजा न उघडल्यास समजावे कि आम्हांस आपणास भेटावयाचे नाही.
- आम्ही शाकाहारी आहोत, पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.
- इथे मुत्रविसर्जन करू नये. केल्यास कायमचा ईलाज केला जाईल.
- इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीज व स्वस्त दरात नारळ मिळतील.
- इथे हापूस आंबे, कोकम सरबत व परकर मिळतील.
- गिर्हाईक हा राजा असतो. राजा कधीही ऊधार मागत नाही.
- मस्तानी पार्सल करून मिळेल.
- मंदिरात जास्त वेळ बसू नये. तुम्ही रिकामटेकडे असाल, पण ही बाग नाही.
- शांतता राखा. थुंकू नका. माणसासारखे वागा.
- सेल्समनांस सुचना: सदर इमारतीत विक्री न झाल्यास सोसायटी जबाबदार नाही.
- सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य.
- इथे जोशी रहात नाहीत. पुन्हा पुन्हा विचारू नये.
(व त्याच घरासमोरील पाटी): जोशी इथे रहातात. इकडे-तिकडे विचारू नये. - फ़ाटकावरील आतील बाजूची पाटी: बाहेर जाताना फ़ाटक बंद न केल्यास पुन्हा आत घेतले जाणार नाही.
- बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहिही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये.
- येथे चोरी करणारा नेहमी पकडला जातो. याची कृपया नोंद घ्यावी.
- भिकारी लोकांस सुचना: कुत्रे व भुतांपासून सावध रहा.
- सेल्समननी आत येऊ नये. सेल्सगर्ल आत आल्यास मालक जबाबदार नाही.
- पत्ता सांगायचे ५ रूपये पडतील. हे असे का लिहीले आहे हे सांगायचे १० रूपये पडतील.
- पोष्टमनास सुचना: कृपया पत्रें या खिडकीतून आत टाकू नयेत. आमटीत पडतात, चव बिघडते.
- आजचे ताजे पदार्थ: भजी व मिसळ. मुळव्याधीचे औषध मिळेल.
- आम्ही ऊपवासाचे पदार्थ वेगळ्या तव्यावर करतो.
- लाईट गेल्यास कॆण्डल-लाईट डिनरचा वेगळा चार्ज पडेल.
- वेटरला टिप देऊ नये. आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.
- बाहेरील पदार्थ आत आणू नयेत. आतील पदार्थ बाहेर नेऊन खाल्ले तर चालेल.
- कृपया चूळ भरताना घाणेरडे आवाज काढू नयेत.
- आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.
- ए नाही अहो रिक्षावाले म्हणा.
- रिक्षात तंबाखु, गुटखा खाऊन बसू नये व बसून खाऊ नये.
- अनोळखी वस्तू किंवा व्यक्तींस स्पर्श करू नये.
- गाडीवरील धुळीत लिहिलेले वाक्य: आता तरी पुसा!
- गॆरेज: इथे अपली वाहणे कालजीपूवक दुरुस्ती करूण मिलेल
- इथे अर्जंट शेवया करून व ब्लाऊज शिवून मिळेल.
- येथे लघवी करू नये. वरून लोकं पहातात.
- "दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र": डेअरी!
- "दंतोपचार, दंत दुरूस्ती व दंतौषधी विक्री केन्द्र" : डेन्टल क्लिनीक!
Monday, 30 July 2012
रक्षाबंधन
रक्षाबंधन
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.
रक्षाबंधनचा सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
रक्षाबंधन
नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा- राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. श्रावण शुद्ध पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे[ संदर्भ हवा ]. या विधीस 'पवित्रारोपण' असे म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे[ संदर्भ हवा ].पद्धत
श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस 'रक्षाबंधन' या नावाने प्रसिद्ध असून हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. या पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.कथा
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नेसल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी. राखी बांधताना बहिणीने म्हणावे- येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे.) राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करते. रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल. रक्षाबंधन म्हणे केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांनासुद्धा राखी बांधते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाची विनंती करणे, हीच यामागची भावना आहे. रजपूत लोक शूर, कडवे म्हणून विशेष प्रसिद्ध. कडवे म्हणजे शब्दास जागणारे आहेत. फार पूर्वी राजपूत काळात त्यांची साम्राज्ये होती. त्या वेळेपासून हा सण साजरा केला जात आहे. स्त्रिया आपला पती, भाऊ यांच्या मनगटास राखी बांधतात. राखी म्हणजे दोऱ्याचे बंधन. ही राखी स्त्रिया कलाकुसरीने आकर्षक बनवतात. दोऱ्याचे बंधन घालून स्त्रिया आपली, आपल्या अब्रूचे रक्षण करण्याची जबाबदारी, बंधन तुमच्यावर आहे, असे त्या पुरुषास- भावास सांगतात. त्यामुळे त्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली, तिच्या रक्षणार्थप्रसंगी प्राण द्यायचे ही राजपुतांची नीती होती. याची बरीच उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे, तर चितोडवर जेव्हा बहादूरशहाने हल्ला केला, त्या वेळी राणी कर्णावतीने बाबरचा पुत्र हुमायूनला राखी भेट पाठवून आपले व आपल्या राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. हुमायूनने देखील जाती-धर्म याचा विचार न करता चितोडचे रक्षण केले. राखी पोर्णिमेसच "श्रावणी' असेदेखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय. श्रावण नक्षत्रावर श्रावणी करतात. "राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ धर्माचे रक्षण करणे हाच आहे. पूर्वीपासून सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई, ती आजही होतेच आहे. या मनाच्या खेळात आपला शाश्वत पाठीराखा कोणी असावाच, ही भावना मग भावाजवळ येऊन थांबते, ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतच. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते. याला इतिहास साक्ष देतो जात-धर्म-पंथाला छेद देत हे आपल्याला ज्ञात आहेच. हे संदर्भ लक्षात घेऊन "राखी' बांधली तर तो आजन्म कृष्णासारखा होतो. म्हणूनच दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भ, संस्कार महत्त्वाचा, हेच या दिवसाचे माहात्म्य आहे.
Sunday, 29 July 2012
शब्दा वाचून तिला सगळ काही कळते
शब्दा वाचून तिला सगळ काही कळते
ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का?
तो: permission काय घेतेस... विचार जे विचारायच्या ते...
ती: तू रोज कविता का करतोस?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...
... ती: मग कवितेत का रडतोस?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...
ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ?
भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते, मी रे स्तब्ध...
तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी...
शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...
ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता ?
तो: आहे कोणीतरी ... जी माझी असून हि माझी नाही...
ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे?
तो: दिसते ती परी सारखी, अन राहते......
हम्म्म्म..... राहते माझ्या हृदयात...
ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग... पण फुकट पकावू नकोस ..
तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस...
ती आहे परी सारखी , फक्त माझ्यशीच बोलणारी...
मनातल सगळ काही फक्त मलाच येऊन सांगणारी...
दररोज मला भेटणारी, अन माझ्या समोर बसून,
फक्त मलाच पाहणारी ....
ती: (विचारात गुंग होऊन) कोण असेल ती????
तो: (तिच्याकडे पाहत हसतो, अन मनातल्या मनात बोलतो )
तू समोर असून हि, तुला सांगता येत नाही...
मनातल गुपित माझ्या,का जणू मांडता येत नाही...
घाबरतो ग, हरवून बसेन मी तुला ,
कारण तुझ्या शिवाय, आता मला जगणं जमत नाही....
काही वेळाने तिला कळतं, त्याच्या मनातल गुपित,
आपोआप उलगडतं, तो काहीही न बोलता,
ती सगळ बोलते, मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाच नाव जोडते...
कळत नकळतच ते मित्र होतात, कळत नकळतच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते..
....................................pravin jadhav
प्रेम काय असत?
प्रेम काय असत?
एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत?
देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
तिला एक फूल आवडल,
पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,
तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला ,
"हेच आहे प्रेम"
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते.....
..............................pravin jadhav
Monday, 2 July 2012
PhotoFunia
PhotoFunia :: photo effects, filters, free online photo editor
www.photofunia.com/PhotoFunia is an online photo editing tool that gives you a fun filled experience.
Subscribe to:
Posts (Atom)